Thursday, September 8, 2011

दामेंडा पाडानं गाणं ३



नवरा नवरी लक्ष्माबाई
नवरी गयी तिना मामांना गायी
मामाजी मामाजी आंदण कायी
दिसू वं भाच्याबाई कपिल्या गायी
कपिल्या गायनी धांड्यानी जोडी
धांड्यानी जोडीवर रंगीत गाडी
रंगीत गाडीवर पलंग-पेढी
पलंग-पेढीवर हंडा नी गुंडा
हंडा नी गुंडावर चरी ना परी
चरी नी परी वर समया चारी
इतलं लिशी वं परघर जाशी
आयबाना जीवले झया लावशी
सासरा म्हणे सून माले भागनी झायी
तांदुय पेरत देव्हारे येई
सासू म्हणे सून माले भागनी झायी
सोनाना पाऊल मन घर येई

(कठीण शब्दांचे अर्थ
चरी = कांस्याचे मोठे तांबे)

दामेंडा पाडानं गाणं २ (अंघोळीच्या वेळी म्हणावयाचे गाणे)



नवरदेव नवरी गं कशा न्हाती
तेच पानी गं बने जाती
तेच पानी गं मोर पेती
तठून मोर गं उधळीला
आंबा चाफ्यावर बसविला
आंबा चाफ्याचा हिरवा काचा
काय सांगस रे सगा भाचा
कंठी मिरविली चारी दिवसा
आंग मरदिलं हयदिचं
गया वेढिला पोयताचा
मनगट वेढिला काकणाचा
मरोठ भरीला कुंकवाचा
कपाय वेढिलं बांशीगाचं
कोरे घातली काजळाची
ओठ रंगीला नागीणीचा

(कठीण शब्दांचे अर्थ
मरदिलं = चोळणे
मरोठ = भांग, मांग, सिंदूर लावण्याची जागा
नागीणीचा = विड्याचे पान )

Monday, December 21, 2009

दामेंडा पाडानं गाणं १


सोनानी कुदाई रुपानं दांड, रुपानं दांड
खंदानी खंदा ( गावाचे नाव )नी खाण, ( गावाचे नाव )नी खाण
( गावाचे नाव )नी खाणनी रेवायी माटी, रेवायी माटी
ती माटी ती माटी तमाणे भरा, तमाणे भरा
तमाणे भरा रुमाले झाका, रुमाले झाका
वाजत गाजत कुमार(कुंभार) घरी, कुमार घरी
कुमार भाऊ तु दामेंडा(मडके) घडी, दामेंडा घडी
घरधनी जागाडे मायन्या बहिणी, मायन्या बहिणी
मायन्या बहिणी तुम्ही रांधाले इंगा, रांधाले इंगा
आणानी आणानी गंग्यानं पाणी, गंग्यानं पाणी
कणीक भिजील्या डाबान्या वाणी, डाबान्या वाणी
लोयाच भरील्या निंबुन्या फोडी, निंबुन्या फोडी
खिरच रांधिली कापुरना डेरा, कापुरना डेरा
भातच रांधिला मोगरान्या कया, मोगरान्या कया
पापड तयिला पुनीना चांद, पुनीना चांद
कुल्लाया तयिल्या सुर्याला तेज
बोंडेच काढीले मखमली गेंद, मखमली गेंद
शिय्याच वयल्या आसमानना तारा, आसमानना तारा
लाडुच बांधीला रामना चेंडु, रामना चेंडु
जेवाडा जेवाडा नवरदेवनं गोत, नवरदेवनं गोत
नवरदेवना गोतनी भुकमोड झायी, भुकमोड झायी
नवरीना बाप तो वाण्याघर जायी, वाण्याघर जायी
शेरभर आटा तो मोजीवं लयी, मोजीवं लयी
त्याबीवं आटानी चुटपुट झायी, चुटपुट झायी
बलावा बलावा गावना न्हायी, गावना न्हायी
भलाया पाटीलनी भलायी कयी, भलायी कयी
नवरदेवना बापनी हेटुयी(फजिती) झायी, हेटुयी झायी.

टिप: काही अवघड शब्दांचे अर्थ कंसात दिलेले आहेत.

हळदीचे गाणे (आयतं पोयतं)

हे गाणे हळदिच्या वेळी म्हटले जाते.

गंगा जमुना दोन्ही खेते
गंगा जमुना दोन्ही खेते

तठे काय देव पोयाना रोपे
तठे काय देव पोयाना रोपे

तठे काय सिताबाई काते
तठे काय सिताबाई काते

तठे काय कापुसना बेटे
तठे काय कापुसना बेटे

इस्नु किस्नु कांडया भरे
इस्नु किस्नु कांडया भरे

रायरुखमनी पोयतं करे
रायरुखमनी पोयतं करे

तठलं पोयतं कोणले आणं
तठलं पोयतं कोणले आणं

तठलं पोयतं (नवरदेवाचे नाव) ले आणं
तठलं पोयतं __________ ले आणं

नवरदेवना बाप घोडे उना
नवरदेवना बाप घोडे उना

बाशिंग मोती जडे उना
बाशिंग मोती जडे उना

वाजा गहे रथ उना
वाजा गहे रथ उना

मोती पहे रथ उना
मोती पहे रथ उना


शेवटच्या चार ओळी बापाच्या
जागेवर चुलता व इतर नावे
घेवुन पुन्हा पुन्हा म्हटल्या जातात.